Pune News : पुण्यातील पुलांच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिटला मंजुरी
Bridge Safety : पुण्यातील पूल, उड्डाणपूल व नाल्यांवरील संरचना सुरक्षित आहेत का, यासाठी महापालिकेने १.१८ कोटींच्या स्ट्रक्चरल ऑडिट निविदेला मंजुरी दिली आहे.
पुणे : पुणे शहरातील नदीवरील पूल, रेल्वेपूल, उड्डाणपूल, नाल्यांवरील कलव्हर्ट सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्थायी समितीने एक कोटी १८ लाख रुपयांच्या निविदेला मान्यता दिली.