Pune News: उपचारासाठी झोळीतून तीन किलोमीटर प्रवास; बोपे येथील वाघमाची कचरे वस्तीवरील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल
Health care: भोर तालुक्यातील बोपे येथील वाघमाची कचरेवस्तीत पक्का रस्ता नसल्याने आजारी आणि जखमी नागरिकांना उपचारासाठी झोळीतून मैलोनमैल पायपीट करावी लागते. या मूलभूत सुविधेच्या अभावामुळे नागरिकांचे हाल होत असून आरोग्य धोक्यात आले आहे.
महुडे : बोपे (ता. भोर) येथील वाघमाची कचरेवस्तीला पक्का रस्ता नसल्याने अप्पाजी रामचंद्र कचरे या ६५ वर्षीय वृद्धाला उपचारासाठी घरापासून कापडी झोळीतून तीन किलोमीटरचा प्रवास करत पक्क्या रस्त्यापर्यंत ग्रामस्थांना न्यावे लागले.