आई वडिलांसोबत दुपारी त्याने गप्पा मारल्या अन् संध्याकाळी केली आत्महत्या

वृत्तसंस्था
Sunday, 5 July 2020

अविनाश अरुण चोरे (वय २२, रा. शिक्षक काॅलनी, रामलिंग रोड, शिरुर) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल (ता. 3) सायंकाळी हा प्रकार घडला.

 

शिरुर : येथील अविनाश अरुण चोरे (वय २२, रा. शिक्षक काॅलनी, रामलिंग रोड, शिरुर) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल (ता. 3) सायंकाळी हा प्रकार घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

किरण तुकाराम चोरे (रा. डोंगरगण, ता. शिरुर) यांनी या बाबतची खबर पोलिसांना दिली. ते मृत अविनाश याचे चुलत भाऊ आहेत. याबाबत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (ता. ०४) अविनाश हा आई-वडीलांसह घरीच होता. दुपारी तीनच्या सुमारास त्याचे वडील शिरुर शहारात बाजारात जाऊन आले. त्यानंतर तो घरातील हाॅलमधे काही वेळ गप्पा मारत बसला.
-------------
चीनवर आता नवं संकट; तब्बल १०६ जणांचा मृत्यू
------------  
उत्तरप्रदेश, बिहारमध्ये एकाच दिवसात वीज कोसळून तब्बल ४३ जणांचा मृत्यू
------------
आई - वडील इतर कामात असताना अविनाश याने स्वयंपाक घरात जाऊन छताच्या पंख्याच्या हुकाला सूती दोरीने गळफास घेतला. काही वेळाने त्याची आई कामानिमित्त स्वयंपाक खोलीत गेली असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. अविनाशच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस नाईक वैभव मोरे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student committed suicide in Shirur