सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 August 2019

आळंदी येथे एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीबीए (कॉम्पुटर ॲप्लिकेशन) विभाग, पुणे सायबर सेल व क्विक हिल फाऊडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सायबर गुन्हे व जागरूकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पिंपरी - आळंदी येथे एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीबीए (कॉम्पुटर ॲप्लिकेशन) विभाग, पुणे सायबर सेल व क्विक हिल फाऊडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सायबर गुन्हे व जागरूकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

पहिल्या सत्रात क्विक हिल फाऊंडेशनच्या कार्यकारी प्रमुख सुगंधा दाणी यांनी समाजात सोशल नेट्‌वर्किंग साइट्‌स वापरताना विद्यार्थांनी व पालकांनी तसेच इतर सामाजिक व्यवस्थांनी कोणती काळजी घ्यावी, शैक्षणिक व्यवस्थेत समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक पद्धतीने व्हावा, या संदर्भात मार्गदर्शन केले. या विभागांमध्ये सामंजस्य करार झाला. यात शालेय विद्यार्थांना सायबर गुन्हे व जागरुकता या विषयावर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवतील. या उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थांना फाऊंडेशनकडून मानधनही दिले जाणार आहे. दरम्यान, या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पुणे शहर सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार व हवालदार उमा पालवे यांनी सायबर कायदा, सायबर दक्षता, सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. सायबर गुन्हा कशा पद्धतीने घडू शकतो, इंटरनेट कशा पद्धतीने हाताळतोय आणि ते हाताळताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्या-लयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे व सर्व विभाग प्रमुख उपाथित होते. सूत्रसंचालन प्रा. अमित ताले यांनी केले. आयोजन विभागप्रमुख प्रा. अक्षदा कुलकर्णी, डॉ. विकास महांडुळे, कविता महाजन, अपर्णा खाडे, विद्या चानगुडे, शिल्पा कोल्ह, सचिन पोंडे यांनी केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Guidance about Cyber Crime