वरवंड - वरवंड (ता. दौंड) येथून महामार्गाने घरी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीची शनिवारी (ता. १०) रात्री भररस्त्यात उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण अतिगंभीर जखमी झाला आहे. आदित्य सतीश खराडे (वय २३), असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर अविनाश संभाजी खराडे (वय २१, दोघेही रा. हिंगणीगाडा, ता. दौंड), असे जखमी झालेल्याचे नाव आहे.