#SafeKids आगीपासून संरक्षणासाठी विद्यार्थी सज्ज

सुवर्णा चव्हाण
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - दिवाळीत फटाक्‍यांपासून होणारे अपघात असो वा घरातील आगीपासून बचावासाठी शालेय विद्यार्थ्यांना जागृत करण्याचे काम ‘सेफ किड्‌स फाउंडेशन’ ही सामाजिक संस्था करीत आहे. गप्पा, गोष्टी, खेळ, गाणी अन्‌ पथनाट्य अशा विविध माध्यमींतून विद्यार्थ्यांना आगीपासून बचाव कसा करायचा, याची माहिती दिली जाते. यासाठी शाळांमध्ये ‘सेफ किड्‌स ॲट होम’ ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. फाउंडेशनने आतापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ९६ शाळांमधील ४ लाख ५५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले दिले असून, विद्यार्थी आता स्व-बचावासाठी सकारात्मक पावले उचलू लागल्याचा बदल जाणवत असल्याचे संस्थेचे प्रतिनिधी सांगतात.  

फाउंडेशनचे ४० प्रतिनिधी शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा घेत असून, व्हिडिओ, नाटक, विविध खेळ, गृहपाठ, गाणी अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना आगीपासून व अपघातापासून बचाव कसा करायचा, हे शिकवतात. तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा घेतली जाते.

फाउंडेशनच्या प्रकल्प संचालक डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या, ‘‘आम्ही केलेल्या सर्वेक्षणात आगीपासून भाजण्याच्या घटना विद्यार्थ्यांमध्ये वाढत असल्याचे दिसून आले. म्हणूनच आम्ही खास कार्यक्रम तयार केला. तीन वर्षांपासून शाळांमध्ये ही कार्यशाळा घेतली जाते. आगीपासून बचाव कसा करायचा, याची माहिती प्रात्यक्षिकांसह शिकवतो.  हनीवेल संस्थेसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाच्या सहकार्याने या कार्यशाळा घेण्यात येते. फाउंडेशनने शंभर वस्त्या आणि ३०० शाळांत फायर कमिटी स्थापन केली आहे.  

छोट्या प्रात्यक्षिकांद्वारे फायर सेफ्टीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करीत आहोत. शाळांसह वस्त्यांमध्येही हा उपक्रम राबवीत आहोत. २४४ वस्त्यांमधील ३ लाख लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहोत. जनजागृतीमुळे बदल दिसू लागले आहेत.  
- मिलिंद गुडदे, प्रकल्प समन्वयक, सेफ किड्‌स फाउंडेशन

आग लागल्यावर बचावासाठी काय करायचे, अशी माहिती कार्यशाळेत घेता आली. यातून खूप शिकायलाही मिळाले. ’’
- नेहल सुराणा, विद्यार्थिनी 

Web Title: Student ready for fire protection