विद्यार्थीनीने परत केले ज्येष्ठ नागरिकांचे सापडलेले दहा हजार 

संदीप जगदाळे
गुरुवार, 24 जानेवारी 2019

हडपसर - महाविदयालयीन विद्यार्थीने ज्येष्ठ नागरिकांचे सापडलेले दहा हजार रूपये परत केले. तिच्या प्रामाणिक पणाबद्दल हडपसर पोलिसांनी तिचा सत्कार केला. अंकिता पांडुरंग राऊत असे त्या विदयार्थीनीचे नाव. 

हडपसर - महाविदयालयीन विद्यार्थीने ज्येष्ठ नागरिकांचे सापडलेले दहा हजार रूपये परत केले. तिच्या प्रामाणिक पणाबद्दल हडपसर पोलिसांनी तिचा सत्कार केला. अंकिता पांडुरंग राऊत असे त्या विदयार्थीनीचे नाव. 

सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन ते हडपसर या बसने अंकिता प्रवास करत होती. तिच्या शेजारी कमलाकर देव (वय 81 ) हे बसले होते. ते मगरपट्टा चौकात उतरले. त्यानंतर अंकिताला दहा हजार रूपये व कागदपत्रे असलेली बॅग सिटवर मिळाली. तिने हडपसर येथे उतरल्यानंतर पैसे व कागदपत्रे असलेली बॅग हडपसर पोलिस ठाण्यात जमा केली. त्यानंतर बॅंकेच्या पासबुकच्या आधारे बॅंकेशी संपर्क साधून देव यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्या आधारे देव यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची रक्कम व कागदपत्रे देण्यात आली. 

देव सकाळशी बोलताना म्हणाले वयाच्या 81 व्या वर्षी मी पहिल्यांदा पोलिस ठाण्यात आलो. या निमित्ताने पोलिसांमध्ये व अंकिता या दोघांमधील माणूसकीचे दर्शन झाले. जगात चांगली माणसे असल्यामुळेच जग चांगल्या पध्दतीने सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The student returned ten thousand of the senior citizens