बारा वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बारा वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published on

PGR26B03434
समर्थ काळे
...
वाणेवाडीत विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या
.........
पांगरी : बार्शी तालुक्यातील वाणेवाडी शिवारात बारा वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. समर्थ नानासाहेब काळे (रा. कुसळंब, ता. बार्शी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत भारत साधू काळे (वय ५२ रा. घारगाव ता. परांडा) यांनी बार्शी तालुका पोलिसात दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे की, समर्थ हा कुसळंब येथील शाळेत सहावी इयत्तेत शिक्षण घेत होता. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास वाणेवाडी गावच्या शिवारातील सुभाष सुब्राव लावंड यांच्या शेती गट नं.१६१/१ मधील कडुलिंबाच्या झाडाला काळ्या-पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. समर्थचे वडील नानासाहेब साधू काळे हे कुसळंब येथे हॉटेल व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com