

Young Entrepreneur Grows Global Flowers While Continuing Education
Sakal
सोमाटणे: आधुनिक तंत्रज्ञानाने परदेशी फूलशेती करून शिक्षणाबरोबर शेतीतून पैसा कमावण्याचा अनोखा मार्ग चांदखेड येथील प्रथमेश गायकवाड या शेतकऱ्याने शोधला. मावळातील शेतकऱ्यांच्या बरोबर आपले आईवडील हे मुख्य पीक भाताच्या उत्पन्नाबरोबर ऊस, धान्य, भाजीपाला कडधान्य, फुले आदींची शेती करत. ही पिके शेतकऱ्यांची फारशी आर्थिक प्रगती वाढवणारी ठरत नव्हती. शेतीच्या पिकातून फारसा नफा मिळत नव्हता. तो केवळ गरजा भागवण्यापुरता होता.