बारावी पास झालो, पण 'सीईटी' कधी ? विद्यार्थ्यांचा प्रश्न

students and parents are worried about CET Exam After 12th Exam Result declared
students and parents are worried about CET Exam After 12th Exam Result declared
Updated on

पुणे : बारावीचा निकाल लागला, चांगले गुणही मिळाले आहेत, पण पदवी अभ्यासक्रमासाठीच्या 'राज्य सामाईक प्रवेश परीक्षा' (सीईटी) कधी होणार ?, अजून किती काळ अभ्यास करायचा या विचाराने विद्यार्थी, पालक मानसिकदृष्ट्या थकले आहेत. त्याचा परिणाम गुणांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेचे एकदाचे ठरला अन मोकळे करा अशीच प्रतिक्रिया विद्यार्थी, शिक्षक व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

इयत्ता १२वी नंतर नामवंत अभियांत्रिकी, औषधनिर्माण, विधी, हाॅटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी ११वीत असल्यापासूनच 'सीईटी'च्या अभ्यासाला लागतात. यासाठी हजारो रुपये शुल्क भारून क्लास लावतात. मात्र यंदा कोरोनामुळे 'सीईटी'च्या प्रवेशावर अवलंबून असेलेले लाखो विद्यार्थी पेचात सापडले आहेत. राष्ट्रीय पातळीवर जेईई, नीट या परीक्षा सप्टेंबर मध्ये होतील, १५ ऑगस्टला आढावा घेऊ त्यानंतर शिक्कामोर्तब केले जाईल असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून स्पष्ट केले जात आहे. पण राज्यात 'सीईटी'सेल कडून संवाद नाही. जुलै मधल्या परीक्षा रद्द केल्या त्यानंतर काहीच माहिती आली नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढत आहे. सीईटी सेलकडून अद्याप १४ परीक्षा प्रलंबित असून, त्यासाठी ६लाख ९६ हजार २५अर्ज आले आहेत. याबाबत उच्चतंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

" केंद्र सरकारने जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्स, नीट यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यात धर्तीवर राज्य सरकारने 'सीईटी'च्या तारखी जाहीर कराव्यात. पण याबाबत शासनाचे  स्पष्ट  धोरण नसल्याने गोंधळ अाहे. विद्यार्थीही आता मानसिक दृष्ट्या थकले असल्याने त्याचा परिणाम गुणांवर होणार आहे. कोवीड १९ मुळे परीक्षा उशीरा होणार असतील तर इंजिनीयरींगसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रम जानेवारी पासून सुरू करावेत. एक सेमिस्टर उशीर झाला तर पुढील ३-४ वर्षांत ते भरून काढता येणे शक्य आहे."
- दुर्गेश मंगेशकर, कार्यकारी संचालक, आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्र

"जुलै मध्ये सीईटी होणार म्हणून चांगले वाटले होते, पण पुन्हा परीक्षा पुढे ढकलली. नेमकी परीक्षा कधी होणार हे माहिती नसल्याने अभ्यासात सातत्य रहात नाही, त्याचा तणावही जाणवत आहे. त्यामुळे तारीख निश्चित करून आमची परीक्षा घेऊन टाकली पाहिजे."
- आल्हाद मराठे, विद्यार्थी

"सीईटीचा गेल्या अनेक महिन्यांपासून अभ्यास करत आहे. पण आता परीक्षेचे काही कळत नसल्याने डिप्रेशन येत आहे. मी इतके महिने अभ्यास केलाय, आता परीक्षा झाली म्हणजे शेवटही गोड होईल, लवकर तारीख निश्चित करावी."
- महेश कार्हाळे,  विद्यार्थी

सीईटी घ्यावीच लागेल
देशभरात वेगवेगळ्या प्रकारचे २७ बोर्ड आहेत, प्रत्येकाचे गुण देण्याची पद्धत असल्याने काहींना त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १२वी नंतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना 'सीईटी' घेणे अनिवार्य केले आहे, असे मंगेशकर यांनी सांगितले.

 बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा ; पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला पण...

सीईटी परीक्षा व आलेले अर्ज
एमएचटी-सीईटी - ५, ३२, ३६१
विधी ३ वर्ष -४३१७१
विधी ५ वर्ष - २३, ९८७
बीएड - ५५,५५७
बीपीएड -७०४६
बीएचएमसीटी -२४७५
बीए. बी एड, बीएससी. बी एड -२४७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com