अकरावी अॅडमिशन : सर्व्हर डाउनमुळे विद्यार्थी-पालक हैराण!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

- अकरावी प्रवेश प्रक्रिया
- हेल्पलाइनही सातत्याने 'बिझी'
- विद्यार्थी-पालक हैराण

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग-एक भरताना तांत्रिक अडचणींमुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेश प्रक्रियेतील शुल्क ऑनलाईनद्वारे भरताना सर्व्हर सातत्याने डाउन होत असल्याने विद्यार्थी-पालक हैराण झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे औपचारिक उद्घाटन झाले. तसेच प्रवेश अर्जातील भाग-एक भरण्यास शनिवारपासून सुरवात झाली. प्रवेश प्रक्रियेतील भाग-एक भरण्याचा शनिवार हा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी-पालक यांच्याकडून अर्ज भरण्याची लगबग सुरू होती. अर्ज भरताना संबंधित संकेतस्थळ हे कासव गतीने सुरू होते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत, तर प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन शुल्क भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे.

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची आकडेवारी :
- प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : ७३,२४१
- लॉक्ड झालेले अर्ज : १,७७६
- ऑटो व्हेरिफाय अर्ज : १,११६
- व्हेरिफाय अर्ज (पडताळणी) : २१

अकरावी प्रवेशाचे 'अॅप' लवकरच होणार कार्यन्वित

"अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी लवकरच मोबाईल अॅप सुरू करण्यात येणार आहे. सध्या या 'अॅप'चे टेस्टिंग सुरू आहे. प्रवेशाचा भाग दोन भरणे सुरू होईल, तेव्हापासून हे अॅप कार्यन्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत."
- मीना शेंडकर, सचिव, इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students and parents said there are technical difficulties in paying fees online for the 11th admission

टॅग्स
टॉपिकस