esakal | परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC_Candidates

'कोरोना'मुळे एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा 'एमपीएससी'ला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. सुधारीत नियोजनानुसार आता राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी राज्यात घेतली जाणार आहे.

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'कोरोना' संकट असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात तीन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या काळात सुरक्षितपणे परीक्षा पार पाडण्यासाठी आयोगाच्याच तयारीची कसोटी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला बेसिक कोवीड कीटसह इतर सुविधा देऊन खबरदारीच्या उपाययोजना आयोगाने हाती घेतल्या आहेत.

सावधान! बोगस ऑनलाइन भाडेकरार दस्त करणारी टोळी राज्यात सक्रिय​

'कोरोना'मुळे एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा 'एमपीएससी'ला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. सुधारीत नियोजनानुसार आता राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी राज्यात घेतली जाणार आहे. या परीक्षा ऐन कोरोनाच्या काळात होत असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केली होती. मात्र, आयोगाने स्पष्ट नकार दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडचे परीक्षा केंद्र उपलब्ध होणार नाही, त्यांना मुंबई, पुणेच गाठावे लागणार आहे. 

खवा खा, पण दूधाला भाव द्या; कोणी केली मागणी?​

या शहरांमध्ये परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवून परीक्षा व्हाव्यात, उमेदवार, परीक्षक सुरक्षित राहावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी १२० विद्यार्थ्यांसाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. याच व्यक्तीकडून थर्मल गनने शरीराचे तापमान मोजले जाईल. 
ओळखपत्र तपासणीसाठी क्यूआर कोड स्कॅनिंगची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक उमेदवार, कर्मचारी यांना मास्क बंधनकारक असणार आहे. 

धक्कादायक : पुण्याचं हवामान होतंय‘एक्स्ट्रीम’; ऊन, पाऊस, थंडी सगळंच होतंय अती​

दोन विद्यार्थ्यांमध्ये दोन मीटरपेक्षा कमी अंतर असू नये. 
त्याचप्रमाणे प्रत्येक उमेदवारास बेसिक कोवीड कीट, हाँडग्लोज, मास्क, सॅनिटाइजर दिले जाणार आहे. तसेच एखादा संशयित रुग्ण वाटल्यास त्यासाठी देखील जास्त काळजी घेतली जाणार आहे. एमपीएससीने या सुविधा पुरविण्यासाठी, परीक्षा केंद्र निर्जंतुकीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये यासह इतर खबरदारी घेतली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)