पुणे - पुणे महापालिकेने घाई गडबडीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. पण तीन वर्षानंतर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) सुधारणेसाठी अखेरच्या चार महिन्यांची मुदत दिली आहे, अन्यथा मान्यता रद्द होणार आहे. त्यामुळे आज तातडीने कमला नेहरू रुग्णालयात ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे.