अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी संतप्त; विद्यापीठाची मात्र सावध भूमिका

ब्रिजमोहन पाटील
मंगळवार, 7 जुलै 2020

सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांना आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून परीक्षा घेण्याचे आदेश दिले. तर, 'यूजीसी'ने २९  एप्रिलच्या मार्गदर्शक सूचनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नेमलेल्या समितीने सप्टेंबर मध्ये परीक्षा घ्याव्यात असा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांना आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून परीक्षा घेण्याचे आदेश दिले. तर, 'यूजीसी'ने २९  एप्रिलच्या मार्गदर्शक सूचनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नेमलेल्या समितीने सप्टेंबर मध्ये परीक्षा घ्याव्यात असा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.​

पुणे : अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या म्हणून  विद्यार्थी बिनधास्त झालेले असताना, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घ्यावी लागेल असे स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून, आमच्या जीवाशी खेळ करू नका. आता परीक्षा घेणार असाल तर नोकरी देण्याची जबाबदारीही घेणार का? असा जाब विचारला आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यावर सावध भूमिका घेत परीक्षेबाबत अधिकृत सूचना मिळाल्यानंतर भूमिका स्पष्ट केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांना आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून परीक्षा घेण्याचे आदेश दिले. तर, 'यूजीसी'ने २९  एप्रिलच्या मार्गदर्शक सूचनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नेमलेल्या समितीने सप्टेंबर मध्ये परीक्षा घ्याव्यात असा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत केंद्र सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. पण आता अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा द्याव्या लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थाचालकांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार असल्याने हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. 

चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू

"यूजीसी'चे परिपत्रक तसेच राज्य शासनाचे निर्देश अद्याप आलेले नाही, त्यानंतर परीक्षेबाबत अधिकृत भाष्य करता येईल"
- डाॅ. एन. एस. उमराणी, प्र- कुलगुरू, पुणे विद्यापीठ 

''देशातील 'आयआयटी' सारख्या संस्था परीक्षा रद्द करू शकतात, तर युजीसीने परीक्षांना मान्यता का दिली? या साथीच्या रोगानंतरही अंतिम वर्षाची परीक्षा ही तितकीच महत्त्वाची बाब असेल तर पदवीनंतर आपल्याला सरकारी नोकरीचे आश्वासन द्यावे लागेल."
- सिद्धार्थ तेजाळे , विभाग प्रमुख, मासु

"राजकारण्यांनी अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा फुटबॉल करून टाकला आहे. दोन महिने झाले ठोस निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने परीक्षा रद्द केलेली असताना आता यूजीसीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुठभर लोकांसाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा."
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पींग हँड

भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा

''परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना धक्काच बसला आहे. अनेक राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता परंतु परीक्षा घेण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने परीक्षा घेण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल."
- कमलाकर शेटे ,उपाध्यक्ष, युक्रांद पुणे शहर

"विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणे आवश्यक अशी भूमिका मी पूर्वीपासून मांडत आलो आहे. परीक्षा देऊन मिळवलेल्या पदवीला महत्त्व राहिल. त्यामुळे 'यूजीसी'चा निर्णय योग्य आहे. विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन विद्यापीठ परीक्षांचे नियोजन करू शकते."
- डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

"उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षे संदर्भात यूजीसीला पत्र लिहून परीक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती. त्यावर 'यूजीसी'ने त्वरीत स्पष्टीकरण देण्यास उशीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यापीठ, महाविद्यालय सर्वच जण गोंधळात पडले आहेत. 
- डॉ. अरुण अडसूळ, शिक्षण तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students angry over decision to take final year exams