esakal | आरक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल;बाबा आढावांचा सरकारवर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल; बाबा आढाव

आरक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल; बाबा आढाव

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

पुणे : भारतीय राज्यघटनेतील कलम ४१ मध्ये रोजगाराचा आणि शिक्षणाचा अधिकार राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आला आहे. मात्र सरकार विद्यार्थ्यांची कलम १६ अर्थात आरक्षणाच्या मुद्द्याने दिशाभूल करत असून, त्यामुळे रोजगार आणि शिक्षणाच्या मूलभूतच अधिकाराकडे दुर्लक्ष होत आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: संत सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा रंगला

अलका टॉकीज चौकात अभ्यासिका विद्यार्थी समितीच्यावतीने रोजगाराची मागणी करणारे आंदोलन करण्यात आले. त्यात ते बोलत होते. आंदोलनात कॉग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परिक्षेचा तणाव आणि भरतीतील दिरंगाईमुळे आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील लोणकर या उमेदवारास श्रद्धांजली वाहण्यात आली होती. बेरोजगारी हे संकट भांडवली व्यवस्थेचा परिणाम आहे. कंत्राटीकरणामुळे रोजगाराची समस्या वाढत असून, तरुणांची आरक्षणाच्या नावाखाली दिशाभूल करण्यात येत आहे. रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकार झालाच पाहिजे, असे मत आढाव यांनी व्यक्त केले. यावेळी विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top