पदवी प्रवेशासाठी डिस्टिंक्शन सुध्दा ठरतेय किरकोळ; विद्यार्थी चितेंत

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 5 September 2020


- पदवी प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित
- ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थी अडचणीत. 
- विद्यापीठाकडे जागा वाढीचा प्रस्ताव दाखल

पुणे : "मला बारावीत ७६ टक्के गुण मिळाले आहेत, बीकाॅमला प्रवेश घेण्यासाठी पुण्यातील सात ते आठ महाविद्यालयांना अर्ज केले. पण ८० टक्क्यांपेक्षा जास्त कटऑफ असल्याने, मला कोठेही प्रथम वर्षाला प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे वर्ष वाया जाते की काय अशी भीती वाटत आहे? ही कैफियत आहे तनिष्का घारेची. अशीच अवस्था पुण्यातील हजारो विद्यार्थ्यांची झालेली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना जागा वाढवून द्यावेत या मागणीने जोर धरला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इयत्ता १२वीचा निकालानंतर पदवी प्रवेशासाठी पुण्यातल्या महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. कोरोनामुळे बाहेरचे विद्यार्थी पुण्यात येणार नाहीत अशी शक्यता होती, पण पुण्यासह महाराष्ट्रभरातून लाखो विद्यार्थ्यांनी बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीए, बीबीए, या अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. बारावीचा निकाल चांगले लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल, इंजीनियरिंग, फार्मसी, कृषी, विधी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ८९ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत आहेत त्यांना प्रवेश मिळणे अवघड झाले आहे.

महाराष्ट्र नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन म्हणाले, "ज्यांना ८० पेक्षा कमी टक्के आहेत, त्यांनी १० महाविद्यालयांना अर्ज केला तरी एकाही ठिकाणी प्रवेश मिळाला नाही. पुण्यात असे किमान २० ते २२ हजार विद्यार्थी आहेत. त्यांना प्रवेश मिळावा म्हणून  महाविद्यालयांचा जागा किमान २० टक्के वाढवाव्यात अशी मागणी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या गुन्हेगारांनो सावधान, आयर्नमॅन आलाय...​

अडीचपट अर्ज वाढले 
१२वीचा निकाल चांगला लागला आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रक्रिया लांबली असल्याने पदवी अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, ''पदवी अभ्यासक्रमासाठी माॅडर्नची क्षमता २ हजार जागांचा आहे. पण यंदा १७ हजार अर्ज आले आहेत. दरवर्षी पेक्षा यंदा अडीचपट अर्ज जास्त आल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. विद्यापीठाकडे दहा टक्के जागा वाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. पुण्यातील इतर महाविद्यालयांमध्ये अशीच आहे."

महाविद्यालयांची संख्या - सुमारे ५० 
प्रवेश क्षमता - सुमारे ५० ते ५५ हजार
अर्ज करणारे विद्यार्थी - सुमारे १ लाख 

- व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने अर्ज वाढले. 
- 'सीईटी' नंतर काही पदवी प्रवेश रद्द होणार
- महाराष्ट्रभरातून अर्जांची संख्या मोठी
- बहुतांश महाविद्यालयांचा कटऑफ ८० टक्क्यांच्या पुढे
- २० टक्क्यांपर्यंत जागा वाढवून देण्याची मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students are worried for Distinction for degree admissions are also minor