Rahul Gandhi Pune: संवाद साधण्यासाठी शेकडो विद्यार्थी हजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

-महालक्ष्मी लॉन्सला रवाना होण्यापूर्वी शहरातील कार्यकर्त्यांबरोबर कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्टइनमध्ये संवाद

- कार्यक्रमाला सध्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील लक्ष्मी लॉन्स येथे विद्यार्थ्यांशी सवांद साधणार आहेत. कार्यक्रमाला सध्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

राहुल गांधी महालक्ष्मी लॉन्सला रवाना होण्यापूर्वी त्यांनी शहरातील कार्यकर्त्यांबरोबर कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्टइनमध्ये संवाद साधला. शहरातील काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आदी 75 जण यावेळी उपस्थित होते. 

शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह राहुल यांची भेट घेतली. यावेळी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर दुष्काळ, जाहिरनामा, प्रचारातील मुद्दे आदींबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. या वेळी मावळ मधील उमेदवार पार्थ पवार, शिरूर मधील उमेदवार डॉ अमोल कोल्हे, शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते. सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. राहुल यांना उमेदवारांची ओळख करून दिल्याचे सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, हडपसरमधील महालक्ष्मी लॉन्स राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी हाॅलबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी झाली असून संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students attends interaction program with Rahul Gandhi in huge number in Pune