NMMS final answer key
sakal
पुणे
Scholarship Exam : एनएमएमएस परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर, निकाल लवकरच संकेतस्थळावर
NMMS final answer key : एनएमएमएस परीक्षेची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. कोणतेही निवेदन किंवा गुणपडताळणी स्वीकारली जाणार नाही. निकाल पुढील शिष्यवृत्ती योजना निर्णयासाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या ‘https://www.mscepune.in/’ आणि ‘https://2026.mscenmms.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
