राजर्षी शाहू स्कॉलरशिपचे वाटप थकले; विद्यार्थी आर्थिक संकटात

Scholarship
Scholarship

पुणे : तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने'तून ७७ कोटी ३५ लाख रुपये वाटप करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र ही रक्कम अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही, याचे त्वरीत वाटप करावे, अशी मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेने उच्च शिक्षण विभागाकडे केली आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना' सुरू करण्यात आली. यामध्ये थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा हातभार लागतो. 

२०१९-२० मधील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडे ६९२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी ६१४ कोटी ८८ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. हा निधी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. मात्र संपूर्ण शिष्यवृत्ती देण्यासाठी आणखी ७७ कोटी ३५ लाख रुपये कमी पडत असल्याने तंत्रशिक्षण आहरित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय २६ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात आला.

ही रक्कम १५ दिवसाच्या आत वाटप होणे गरजेचे होते. मात्र, दोन महिने उलटूनही अद्यापही २०१९-२० मधील थकबाकी संस्थांना आणि विद्यार्थ्यांना मिळाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्था, विद्यार्थी आर्थिक संकटामध्ये आहेत. त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज  शिष्यवृत्ती योजनेची ७७ कोटी ३५ लाखाची रक्कम तत्काळ वितरीत करणे गरजेचे आहे. याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी अपर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संचालक तंत्र शिक्षण विभागाकडे केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com