Crime_Child_rape
Crime_Child_rape

लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : खेळण्याच्या बहाण्याने टेरेसवर नेऊन दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 18 वर्षीय तरुणाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी हा निकाल दिला.

सोन्या ऊर्फ भरत हरिश्‍चंद्र घोलप (वय 18, रा. धनकवडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने या बाबत फिर्याद दिली होती. खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. तर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शैलजा जानकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिस हवालदार आर. एन. त्यांना न्यायालयीन कामकाजात मदत केली.

घोलप याने संबंधित मुलीला घटनेच्या दिवशी सायंकाळी लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने टेरेसवर नेले. त्यानंतर तेथे तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी संबंधित मुलगी ही झोपेत असताना अचानक ओरडली. त्यामुळे तिच्या आईने तिच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

कुटुंबाची जबाबदारी म्हणून कमी शिक्षा द्या :
घोलप याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्याला कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी बचाव पक्षाकडून देण्यात आली होती. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपीला शासन होऊन समाजात चांगला संदेश जाणे आवश्‍यक आहे, असे न्यायाधीशांनी निकालात नमूद करत आरोपीला योग्य ती शिक्षा सुनावली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com