MPSC ची परीक्षा पुढे ढकलली ते ठीक, पण पुढची भूमिका काय?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

सरकारच्या दिरंगाईमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे नुकसान होत आहेत. मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला, पण इतर प्रवर्गातील विद्यार्थी काही प्रमाणात नाराज आहेत.

पुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती आल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा स्थगित करा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर निर्णय घेण्यास विलंब लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर राज्य सरकारला याची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याने विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले आहे, पण पुढील भूमिकाही स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा, मगच MPSCची परीक्षा घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी​

"सरकारच्या दिरंगाईमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे नुकसान होत आहेत. मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला, पण इतर प्रवर्गातील विद्यार्थी काही प्रमाणात नाराज आहेत. परीक्षा झाल्या असत्या तर कोणी तरी न्यायालयात गेले असते, तर पुन्हा अनेक वर्ष निकालाची वाट पहावी लागली असती. तसेच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतरच त्वरित भूमिका स्पष्ट केली असती, तर हा गोंधळ झाला नसता.''
- विश्‍वंभर भोपळे

"कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था होती, पण आता परीक्षा पुढे ढकलल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही. राज्य सरकारने लवकरात लवकर आरक्षणावरची स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत.''
- अनुप देशमुख

राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळलं; जमिनीच्या वादातून घडली धक्कादायक घटना​

"एप्रिल महिन्यापासून परीक्षा वारंवार पुढे जात होती, ऑक्‍टोबरमध्ये तरी परीक्षा होईल असे वाटले होते, पण आयोग राजकारण्यांच्या दबावाखाली काम करत असल्याने परीक्षा लांबणीवर पडली. आता सरकारने थेट यंदाची भरती रद्द करून, पुढच्या वर्षीच भरती करावी.''
- कमल माळी

"आरक्षणाचा लाभ नाकारला असता तर आमच्यावर अन्याय झाला असता, त्यामुळे परीक्षा स्थगित केली याचा आनंद आहे. सरकारने आरक्षण कायम राहावे यासाठी प्रयत्न करावेत, तसेच पुढील धोरण लवकर जाहीर करावे.''
- बबन दागडे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students have welcomed the decision to postpone the MPSC exam