झोपडी नव्हे त्यांची शाळाच पेटवली...ऑनलाइन शिक्षणाची राख रांगोळीच झाली...

विजय जाधव
Tuesday, 22 September 2020

"घरात, गावात कोठेच मोबाईलला रेंज मिळत नाही, त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. रेंज मिळते म्हणून कालव्याजवळ झोपडी बांधून शाळेच्या वेळात तेथे जायचो. पण आता ती झोपडी जाळली, आम्ही अभ्यास करायचा कसा..?'' 
हा सवाल आहे नाटंबीतील (ता. भोर) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा. या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल रेंज असलेल्या ठिकाणी बांधलेली झोपडी अज्ञातांनी पेटवून दिली. त्यामुळे सुमारे 25 विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. 

भोर (पुणे) : ""घरात, गावात कोठेच मोबाईलला रेंज मिळत नाही, त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. रेंज मिळते म्हणून कालव्याजवळ झोपडी बांधून शाळेच्या वेळात तेथे जायचो. पण आता ती झोपडी जाळली, आम्ही अभ्यास करायचा कसा..?'' 
हा सवाल आहे नाटंबीतील (ता. भोर) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा. या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल रेंज असलेल्या ठिकाणी बांधलेली झोपडी अज्ञातांनी पेटवून दिली. त्यामुळे सुमारे 25 विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाटंबीत मोबाईलला रेंज नीट मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचण येत होती. गावाबाहेरील शाळेच्या बाजूला कालव्याजवळ मोबाईलला चांगली रेंज येते. त्यामुळे गावातील विद्यार्थी- विद्यार्थिनी तेथे जाऊन ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहून अभ्यास करू लागले. परंतु ऊन, पावसामुळे त्यातही व्यत्यय येत होता. त्यामुळे काही पालकांनी एकत्र येऊन कालव्याच्या कडेला जेथे रेंज येते, त्या ठिकाणी झोपडी बांधून दिली. झोपडीसाठी बांबू, लाकडे, गवत आणि प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला. विद्यार्थ्यांना खाली बसून व्यवस्थित अभ्यास करता यावा, यासाठी जमीनही साफ केली.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

गावातील सुमारे 25 विद्यार्थी पावसातही झोपडीत बसून व्यवस्थितपणे अभ्यास करीत. सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत विद्यार्थी झोपडीत अभ्यास करीत. सोमवारी (ता. 21) रात्री अज्ञात व्यक्तीने ही झोपडी पेटवून दिली. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांना उभे राहून, जळालेल्या झोपडीत बसून अभ्यास करावा लागला. याबाबत भोर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The students' hut was set on fire