पुणे - दहावीच्या निकालानंतर लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष देऊन आहेत. या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी ठप्प झाल्यानंतर ही प्रक्रिया गुरुवारी दुपारनंतर पुन्हा सुरू होईल, असे विद्यार्थी-पालकांना अपेक्षित असल्याने ते संकेतस्थळाकडे डोळे लावून बसले होते.