पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी होणार "स्मार्ट' 

जितेंद्र मैड
Sunday, 13 September 2020

महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे सर्वच विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्याकडे स्मार्ट फोन नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून ते वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता. अशावेळी रोटरी सारख्या संस्थांनी मदतीचा हात दिला.

कोथरूड (पुणे) : महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे सर्वच विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्याकडे स्मार्ट फोन नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून ते वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता. अशावेळी रोटरी सारख्या संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे सोपे जाईल. वंचित समाजाला पुढे आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटना पुढाकार घेत आहेत याचे समाधान वाटत असल्याचे पंडित दीनदयाळ शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण सांगत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून अध्यापन करणे सोपे जावे, या उद्देशाने रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेजने पुढाकार घेत अनोखा उपक्रम राबवला. 
रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेजच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर, पुणे मनपा मॉडेल शाळा क्र. 74 (मुलींची) या शाळेस 30 नवीन टॅब व संगणक संच भेट देण्यात आले. रोटरी क्‍लबने डिजिटल गुरुमंत्रा हा ई-लिटरसी प्रोग्रॅम राबविला.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

यातून विद्यालयातील दहा शिक्षकांनी यशस्वी सहभाग घेऊन ई-लिटरसीचे प्रमाणपत्र मिळवले. रोहा येथील सुभाष मेहंदळे, रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेज (3131) व स्वाती मुळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी पर्यवेक्षिका अरुणा राहिंज, रोटरीचे अध्यक्ष विनय नेवसे, माधव तिळगुळकर, चित्रा पेंढारकर उपस्थित होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students of Pandit Deendayal School were given a tab by "Rotary"