स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी परतले; दिल्लीकरांनी ठोकला पुण्यातच मुक्काम!

अक्षता पवार
Wednesday, 9 December 2020

शहरात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी देशातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपापल्या मूळ गावी जाण्याची वेळ आली होती.

पुणे : एकाएकी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या 27 वर्षीय विशाल थोरात या युवकाला आपल्या गावी जावावे लागले. त्यात आचानकपणे गावी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व पुस्तके हॉस्टेलवरच राहिली.

Corona Updates: हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या आत​

तर मंचरजवळील वाडा या गावात राहणाऱ्या विशाला वाचनालयाची सुविधापण उपलब्ध नसल्याने मात्र परीक्षेची तयारी कशी करायची हा प्रश्‍न पडला. गावी अभ्यासाचे वातावरण नाही आणि त्यात इंटरनेट, वाचनालयसारख्या इतर सुविधांच्या कमतरतेमुळे परत पुण्याला येण्याचा मार्ग निवडल्याचं तो सांगतो.

शहरात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी देशातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपापल्या मूळ गावी जाण्याची वेळ आली होती. लॉकडाऊनमुळे जेवनाचा प्रश्‍न तसेच वाढती रूग्ण संख्या या भितीमुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळ नेहमी गजबजलेली शहरातील रस्ते आणि खाण्याच्या ठिकाणांवर शुकशुकाट पसरला होता.

गाव कारभाऱ्यांचं नवं आरक्षण ठरलं; तहसीलदारांच्या बैठकीत सोडतीद्वारे झाला निर्णय​

मात्र सध्या अनलॉकमुळे सर्व काही पुन्हा सुरू झाले असून शहरात विद्यार्थ्यांची गजबज पुन्हा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तर विशालसारखे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनीही सध्या पुण्यातच मुक्काम केला आहे. दिल्लीतील वातावरण पाहता शहरातच राहून विविध परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याचे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ई-बाईक सेवा देणारं पहिलं शहर ठरणार!​

"सध्या स्पर्धा परिक्षा होणार असून अद्याप परीक्षेच्या तारखा निश्‍चित झाल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबाबत अनेक संभ्रम आहेत. तसेच सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना शहराची ओढ आहे. शहरात सध्या 30 ते 40 टक्के विद्यार्थी परत आले आहेत. पुढील वर्षाच्या परीक्षेची तयारी तसेच अभ्यासाबरोबर करिअरसाठी इतर संधी अशा दोन कारणांमुळे हे विद्यार्थी शहरात आले आहेत.
- किरण निंभोरे, एमपीएससी स्टूडंट्‌स राईटचे अध्यक्ष

"सध्या परीक्षेच्या तारखा आल्या नाहीत, त्यामुळे क्‍लासेस लावून परीक्षेची तयारी सुरु केली आहे. तसेच परीक्षा होणार आहे की नाही याची माहती घेणे पण गरजेचे आहे. गावकडे थांबल्यावर ते शक्‍य होणार नाही म्हणून पुन्हा शहरात आलो आहे.
- निलेश आंबरे, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा विद्यार्थी

ही आहेत कारणे
- विविध क्‍लासेस आणि अभ्यासाचे वातावरण
- सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध
- योग्य मार्गदर्शन तसेच करिअरशी संबंधित विविध पर्याय उपलब्ध

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students preparing for competitive exams have returned to Pune from hometown