Student Protest: सेना महाविद्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन
Education News: सेना विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांसाठी चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने तातडीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असून विद्यार्थ्यांना शांततेत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे : सेना विधी महाविद्यालयात (एएलसी) गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.