
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे विश्रांतवाडीत अचानक स्थलांतर करण्याच्या प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून समाज कल्याण विभागाने वसतिगृह स्थलांतराला स्थगिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.