मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली

School_Students
School_Students
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 31 जानेवारी 2021पर्यंत नावनोंदणी अर्ज ऑनलाइन भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. 

विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूक केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करण्यासाठी 2 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तर संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी 5 फेब्रुवारीपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करावी, असेही राज्य मुक्त विद्ययालय मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या मंडळातंर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची नावनोंदणीसाठी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water crisis in ambegaon tehsil
IITM and ARIES Sign MoU
Pune
Pune
Marathi News Esakal
www.esakal.com