Pune : सायबर फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber crime

सायबर फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे

पुणे : ‘‘मेंदू आणि मनाचा वापर करून आपण सोशल मीडियावर काय सर्च करतोय, काय फॉरवर्ड करतोय हे पहावे. इंटरनेट वापरण्याचे जसे फायदे आहेत, तसेच दुरुपयोगही मोठ्या प्रमाणात आहेत. सायबर फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे,’’ असा सल्ला सायबर तज्ज्ञ, सहायक पोलिस निरीक्षक कदीर देशमुख यांनी दिला.

सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) आणि पोलिस आयुक्तालयाच्यावतीने सायबर सुरक्षा जनजागृती अभियाना अंतर्गत ‘ऑनलाइन सुविधा शाप की वरदान’ या ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते.

ढोले पाटील अभियांत्रिकी कॉलेजचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, सचिव उमा ढोले पाटील व प्राचार्य डॉ. निहार वाळिंबे या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना फेसबुकसह इतर सोशल मीडिया वापरताना कशी सावधगिरी बाळगावी व इंटरनेट वापरताना काय काळजी घ्यावी, या विषयी प्रशिक्षण देण्यात आले.

फेसबुकवरील आपली प्रोफाइल लॉक करून ठेवावी. सोशल मीडियाची अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी ट्विटरवर ‘@सायबर दोस्त’ला फॉलो करावे. तसेच, काही पैशांची ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी.’’

- कदीर देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक

loading image
go to top