NASA ISRO Visit : नासा, इस्रो भेटीसाठी विद्यार्थ्यांचा कल; १९ हजार २५४ मुलांनी दिली परीक्षा

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अंतराळ संशोधन संस्थांच्या भेटीच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे.
NASA ISRO

NASA ISRO

sakal

Updated on

पुणे - जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अंतराळ संशोधन संस्थांच्या भेटीच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदणीत सुमारे ४७ टक्के, तर प्रत्यक्ष लेखी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी नासा आणि इस्रोला भेट देऊन आलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवामुळे या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, २३ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर १९ हजार २५४ विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षा दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com