esakal | आम्ही राजस्थानमध्ये अडकलो होतो, पण महाराष्ट्र सरकारने...
sakal

बोलून बातमी शोधा

cm.jpg

राज्यातील हजारो विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकले होते. त्यात लोणावळा, खोपोलीच्या देखील काही विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांची राज्य सरकारने सोय केल्यामुळे ते बुधवारी (ता. 29) सकाळी स्वगृही परतले आहेत.

आम्ही राजस्थानमध्ये अडकलो होतो, पण महाराष्ट्र सरकारने...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : राज्यातील हजारो विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकले होते. त्यात लोणावळा, खोपोलीच्या देखील काही विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांची राज्य सरकारने सोय केल्यामुळे ते बुधवारी (ता. 29) सकाळी स्वगृही परतले आहेत.

आणखी वाचा - आता कायमचं घरी बसा, आयटी कर्मचाऱ्यांना येतायत मेसेज

त्यांना पाहून पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. काहींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. देशातील विविध भागातील लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानातील कोटा येथे शिक्षणास जातात. आयआयटी व मेडिकलच्या प्रवेश परीक्षेत यशाचे स्वप्न बाळगणाऱ्यांमध्ये राज्यातीलही हजारो विद्यार्थ्यांचा त्यात समावेश असतो. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना लॉकडाउनचा फटका बसला होता. मेस बंद पडल्यामुळे त्यांचे खाण्याचे हाल झाले होते. राहण्याची सोय नव्हती. त्यांची स्थिती पाहून पालकही व्याकूळ झाले होते.

दरम्यान, त्यांनी अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारने सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अनेक विद्यार्थ्यांनी "सकाळ'कडे व्हिडिओच्या माध्यमातून व्यथा मांडली होती. राज्य सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवत तातडीने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना खासगी बसव्दारे घरी पोचवले.

आणखी वाचा - तंबाखूमुळं खरचं कोरोना पळून जातो?

दिव्यांश कुंभार यांचे पालक सानंद कुंभार यांनी सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, ""गेल्या वर्षभरापासून मुले आमच्यापासून दूर होती. लॉकडाउनमुळे त्यांचे हाल झाले होते. मात्र, राज्य सरकारने आमची मुले आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत, त्याबद्दल खूप आभारी आहोत.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिव्यांश म्हणाला, ""कोटातून इंदूरमार्गे आम्ही निघालो. बुधवारी सकाळी सहा वाजता खारघरला पोचल्यावर आमची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर आम्हाला "होम क्वारंटाइन'चा शिक्का मारल्यानंतर लोणावळ्यात पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावर पोलिसांनी 14 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे. शुभम ओसवाल म्हणाला, ""राज्य सरकारला धन्यवाद देतो, की त्यांनी आमची दखल घेतली. घराची खूप आठवण येत होती. घरी सुखरूप परतल्यामुळे आई-वडील आनंदी आहेत.''