Pune News : वडाची वाडीमध्ये शिक्षणाचा मार्ग खडतर, शाळेच्या रस्त्यावर पाण्याचे तळे; विद्यार्थ्यांसह पालकांची कसरत
Students Struggle : उंड्रीतील वडाची वाडी परिसरात शाळेच्या रस्त्यावर पाणी आणि चिखल साचल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
उंड्री, : शाळेच्या मार्गावरच पाणी साठून राहिल्याने वडाची वाडीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे. शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर आवश्यक उपाययोजना करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.