esakal | अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पण, अनेकांना वेळ पुरलाच नाही कारण..
sakal

बोलून बातमी शोधा

Students suffer due to technical issues in final year online exams


- अनेकांना वेळ पुरलाच नाही
- 58 टक्के विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पण, अनेकांना वेळ पुरलाच नाही कारण..

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेली ऑनलाइन परीक्षा ऑफलाइनच्या तुलनेत सुरळीत पार पडली. पण मोबाइलला नेटवर्क नसणे, प्रश्‍न किंवा पर्याय न दिसणे, उत्तर लवकर सबमीट न होणे अशा तांत्रिक प्रश्‍नांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले. प्रश्‍न सोडविण्यासाठी उशीर होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण प्रश्‍न सोडवता आले नाहीत. त्यामुळे वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केली जात आहे.

कोरोनामुळे पुढे ढकललेली पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने घेण्यात येत आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने खासगी एजन्सी नेमली असून, त्यामाध्यमातून लॅपटॉप, संगणक, मोबाईलवर विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आज (ता. 12) पहिल्या दिवशी 29 हजार 236 विद्यार्थी परीक्षा देणे अपेक्षित होते. त्यापैकी 17 हजार 118 जणांनी परीक्षा दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइनची परीक्षा सकाळी 10 वाजता ठरलेल्या वेळेप्रमाणे सुरू झाली. विद्यार्थ्यांना 'एमसीक्‍यू' परीक्षा देण्याची सवय नसल्याने एका तासात 60 पैकी 50 प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ लागत होता. त्यातच निवड केलेला पर्याय सेव्ह होण्यास वेळ लागणे, प्रश्‍नाचे पर्याय आधी दिसणे मग थोड्यावेळाने प्रश्‍न दिसणे, पर्यायांशिवाय प्रश्‍न येणे अशा अडचणी आल्या. विद्यार्थ्यांची त्यांना जमेल तेवढे प्रश्‍न सोडवत पुढे गेले. अनेक विद्यार्थ्यांचे 15 ते 25 प्रश्‍न सोडवायचे राहिले आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम निकालावर होणार असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी त्यांची परीक्षा व्यवस्थित झाली, कोणताही तांत्रिक प्रश्‍न आला नाही अशी प्रतिक्रिया "सकाळ'कडे व्यक्त केली.

क्षमता १२०० प्रवाशांची अन्‌ प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी

"माझा बिझनेस फायनान्सचा पेपर होता, सराव परीक्षेत सराव केल्याने आज पेपर सोडविताना मला कसलीही अडचण आली नाही. ''
- करिष्मा जुझम, विद्यार्थिनी

"एमसीक्‍यू प्रश्‍न असल्याने परीक्षेसाठी हा कालावधी कमी पडत होता, त्यात परत काही प्रश्‍न अवघड होते. त्यामुळे सर्व प्रश्‍न सोडविता आले नाहीत. तर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्‍नांचे पर्याय दिसत नसल्याने उत्तरे देता आले नाहीत.''
- मोहित जाधव, विद्यार्थी

जंबो कोविड सेंटरमधील तंबू अग्निरोधक 

loading image
go to top