MPSC
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा (संयुक्त) परीक्षेतील एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या निकालातील त्रुटींवरून उद्भवलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) दाखल केलेला खटला रद्द झाल्यानंतर आता विद्यार्थी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.