'सीईटी'च्या अर्ज भरण्याच्या वाढीव मुदतीचा तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

राज्य सामाइक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. याचा फायदा तब्बल ४८ हजार ६३४ हजार विद्यार्थ्यांनी घेत, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'ट्वीट'द्वारे दिली आहे.

पुणे - राज्य सामाइक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. याचा फायदा तब्बल ४८ हजार ६३४ हजार विद्यार्थ्यांनी घेत, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'ट्वीट'द्वारे दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता सीईटी परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार ही ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू केली होती. या वाढीव कालावधीत  ४८हजार ६३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परिक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याचा विचार करून 'सीईटी सेल'तर्फे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. यात बी.एड. अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीसाठी सर्वाधिक १६ हजार ७१५  विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. आता सीईटी परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सविस्तर वेळापत्रक आणि सूचनांची प्रतिक्षा लागली आहे.

पुणे जिल्ह्यात  4571 नवे कोरोना रुग्ण 

वाढीव मुदतीत सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या -
अभ्यासक्रम : विद्यार्थी संख्या

एमपीएड : ३२५
बीपीएड : १,२६५
बीएड : १६, ७१५
एमएड: ६७७
एलएलबी (तीन वर्ष ) : १२,०१०
एलएलबी (पाच वर्ष ) : ४,०६७
बीएड : एमएड : ६४९
बीए./बीएस्सी बीएड. :  १,१२३
एमसीए : १,८९०
बीएचएमसीटी : ३६१
एमएचएमसीटी : ३७
एम-आर्किटेक्चर : २८७
एमएचटीसीईटी : ९,२२८

आता रोज प्या शहाळे पाणी!; "सेव्हन मंत्राज'च्या माध्यमातून घरपोच वितरण 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students took advantage extended deadline fill out the CET application