व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’साठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Form

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’साठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार

पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) (CET) विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (Admission) घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी २०२१’ परीक्षेसाठी (CET 2021 Exam) आतापर्यंत ऑनलाइन अर्ज (Online Form) न केलेल्या विद्यार्थ्यांना (Student) परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपासून (ता.१२) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (ता. १६) अर्ज करता येणार आहेत.

राज्याच्या तंत्र शिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम, विधी, आर्किटेक्चर अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता ‘सीईटी २०२१’ परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया यापूर्वीच संपली आहे. मात्र, तरीही एक विशेष बाब म्हणून आतापर्यंत ऑनलाइन अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘ट्विट’द्वारे माहिती दिली आहे.

तसेच यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामधील दुरुस्तीसाठी १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘https://cetcell.mahacet.org’ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही सामंत यांनी ट्विटद्वारे केले आहे.

Web Title: Students Who Have Not Applied For The Cet Of The Vocational Course Can Apply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top