मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. राज्यात 'पीसीबी' गटाची परीक्षा एक ते नऊ ऑक्‍टोबर, तर 'पीसीएम' गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्‍टोबर दरम्यान झाली.

पुणे : राज्य सीईटी सेलतर्फे घेण्यात येणाऱ्या 'एमएचटी-सीईटी' परीक्षेला कोरोना, अतिवृष्टी आदी कारणांनी विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जास्त असल्याने त्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांनी शंभर रुपये शुल्क भरून शुक्रवारी (ता.२३) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे.

पाकिस्तानच्या चौघांना भारतीयत्व बहाल; पिंपरी-चिंचवडमध्ये आहे वास्तव्य!​

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. राज्यात 'पीसीबी' गटाची परीक्षा एक ते नऊ ऑक्‍टोबर, तर 'पीसीएम' गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्‍टोबर दरम्यान झाली. कोरोना, अतिवृष्टीमुळे जवळपास ३० ते ३५ टक्के विद्यार्थी गैरहजर राहिल्याने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमाचे प्रवेश घटण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रकाशित केले होते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशी मागणी पालकांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. 

पुणे : प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता​

विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर १०० रुपये शुल्क भरून हॉल तिकीट डाऊनलोड करावे. ज्यांनी शुल्क भरले आहे, अशाच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ई-मेल तसेच एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. तसेच वेळापत्रक www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार जाईल, असे सीईटी सेलमार्फत कळविण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students who miss the MHT CET exam will get a chance