Study rooms are closed in pune
Study rooms are closed in pune

Corona Virus : अभ्यासिका बंद झाल्याने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्रस्त

Published on

पुणे : शहरात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अभ्यासिका बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. यामुळे अभ्यासिका सोडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली.

सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती परिसरातील अभ्यासिका बंद करण्यात आल्याने आता अभ्यास करायचा कोठे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी पुण्यात आलेले असतात. कोरोनाच्या भीतीने आधीच काही अभ्यासिकांमधील विद्यार्थी गावी गेलेले आहेत. काही विद्यार्थी अभ्यासासाठी शहरात थांबले होते. मात्र, त्यांनाही आता अभ्यासिका सोडावी लागणार आहे.

राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला आहे. त्यानंतर मे मध्ये "एमपीएससी'ची संयुक्त पूर्वपरीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. गावाकडेच राहून अभ्यास करणार असल्याचे गणेश साखरे, सत्यजित केसरकर, भारत पोरे, आशुतोष शिंदे, किरण माळी या विद्यार्थ्यांनी सांगितले.


कालच आमची अभ्यासिका बंद झाली आहे. आता अभ्यासासाठी गावीच जायचे ठरले आहे. पुढील महिन्यात दोन महत्त्वाच्या परीक्षा आहेत. त्यामुळे आमच्यादृष्टीने हा महत्वाचा कालावधी आहे.
- कृष्णा मोरे, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com