esakal | कल्याण डोंबिवलीत पुन्हा नाशिक पॅटर्न ? । Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

amit thakre

कल्याण डोंबिवलीत पुन्हा नाशिक पॅटर्न ?

sakal_logo
By
शर्मिला वाळूंज

डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मनसेने पुणे, नाशिक नंतर कायम चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. येथील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे मोठे नेते दोन दिवस कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले आहेत.

शहरातील खड्ड्यांवरून अमित यांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करीत रस्ते बांधणे हे काही रॉकेट सायन्स नाही त्यासाठी इच्छाशक्ती लागते, येथील लोकांत ती नाही असा टोला लगावला. राज साहेबांकडे ती असल्याने नाशिकमध्ये चांगले रस्ते झाले, तेथे येऊन पहा असा सल्ला त्यांनी दिल्याने खड्ड्यांवरून कल्याण डोंबिवलीत मनसे नाशिक पॅटर्नचा ढोल पुन्हा पिटणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: पूर नियंत्रणासाठी औरंगाबादला मिळणार १४ कोटी

कल्याण डोंबिवलीतील शाखा अध्यक्षांच्या भेटी मनसेचे अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर, शिरीष सावंत यांनी घेतल्या. यावेळी आमदार राजू पाटील यांसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

रस्ते आणि खड्ड्यांविषयी अमित म्हणाले, या लोकांकडून अपेक्षा ठेवून तुम्हाला काही मिळणार नाही. 25 वर्षे महापालिकेत सत्ता आहे. राजकारणात मुरलेले हे लोक आहेत. एवढ्या वर्षात त्यांना साधे रस्ते नीट बांधता आले नाहीत. रस्ते बांधणे हे काही रॉकेट सायन्स नाही त्यासाठी इच्छाशक्ती लागते. राज साहेबांकडे ती असल्याने नाशिक मध्ये चांगले काम होऊ शकले. 8 - 9 वर्षे झाली रस्ते बनवून, अजून एक खड्डा तेथे पडला नाही. तेथे पाऊस पडत नाही का ? असा सवालही अमित यांनी केला.

हेही वाचा: पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच

मुंबई, ठाणे पासून कल्याण डोंबिवली पर्यंत रस्ते खड्डयांनी भरलेले आहेत. जिथे 1 तास लागतो तिथे 2 ते 3 तास नागरिकांचे जात आहेत. लोकलने 40 मिनिटांत पोहोचलो. महिन्याचा 900 रुपयांचा लोकल पास काढून मी प्रवास केला आहे. उद्याही लोकलनेच प्रवास करणार आहे. लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना पास ची सक्ती न करता तिकीट दिले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

रस्त्यांवरून अमित हे नाशिक मधील कामावर जोर देत होते. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अमित हे सातत्याने नाशिकचा दौरा करीत आहेत. हळूहळू ते राजकारणात सक्रिय होत असून नाशिकची जबाबदारी अमित यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यात कल्याण डोंबिवली दौऱ्यात अमित यांनी नाशिक मधील विकास कामे जाऊन पहा असा सल्ला दिल्याने येत्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत नाशिक पॅटर्नचा ढोल मनसे पुन्हा वाजविणार का ? अशी चर्चा सुरू आहे.

पक्षातर्फे आढावा बैठक आणि राजकीय स्थितीचा अंदाज घेतला जात आहे. याचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका येथील नागरिकांनी मनसे पक्ष, राज ठाकरे यांना नेहमीच पाठिंबा दिला असून एक आपुलकी दाखवली आहे. येथील नागरिकांच्या समस्या सत्ताधारी सोडविण्यात अपुरे पडत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यात. त्यानुसार सर्व आढावा घेतला जाणार आहे असे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

loading image
go to top