बारामती पवईमाळच्या उपसरपंचांचे तिरऱ्यादिवशीही उपोषण सुरूच

Sub panchs of Pawaimal Baramati continue their fast on the third day
Sub panchs of Pawaimal Baramati continue their fast on the third day

माळेगाव : पवईमाळ (ता. बारामती) हद्दीतील जुना होळ रस्ता ते कदमवस्ती रस्त्याचे डांबरीकरण अलिकडच्या काळात वादग्रस्त ठरले आहे. खासदार फंडातून १० लाख रुपये मंजूर झालेल्या या रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी पवईमाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मयुर राजेंद्र कदम यांनी गावात उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

१६ फेब्रूवारी २०२० रोजी मंजूर झालेल्या सदर रस्त्याची जागा स्वमालकीची आहे, असा दावा करीत काहींनी रस्ता होण्यास अडथळा निर्माण केला आहे. विशेषतः या आगोदर संबंधित रस्त्याचे खडीकरण, मुरमीकरणासाठी ग्रामपंचातीने शानस्तराव मोठा निधी खर्च केल्याची नोंद आहे. असे असताना येथील रोहित कृष्णराव जगताप, राजपुरे कुटुंबियांनी डांबरीकरणासाठी अडथळा आणला आहे. त्यासंबंधी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही कदमवस्ती रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, त्यामुळे उपोषणाचा नाइलाजास्तव मार्ग स्वीकारल्याचे मयुर कदम यांनी सांगितले.  दरम्यान, सोमवार (ता.२) रोजी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी उपोषणकर्ते मयुर कदम यांची भेट घेवून प्राप्त स्थितीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आली.

पुणे : मारटकर खून प्रकरणी कुख्यात गुंड बापू नायरला अटक 
 

रोहित जगताप म्हणाले, ''जुना होळ रस्ता ते कदमवस्ती रस्ता आमच्या मालकीच्या जागेतून जात आहे. तसे सातबारा उताऱ्यावरून स्पष्ट होते. त्यासंबंधीची कोणतीही नोंद पवईमाळ ग्रामपंचायतीच्या दप्तरी नाही. या रस्त्याने ये-जा करण्यास आम्ही कोणालाही अडथळा केलेला नाही अथवा करणार नाही. परंतु या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण व खडीकरण करण्यास आमचा विरोध आहे. तसे आमचे लेखी म्हणणे प्राताधिकारी, तहसीलदारांना कळविले आहे. परंतु उपोषणकर्त्यांनी हेतुपुरस्कर आमच्यावर आरोप केलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com