Nirgudsar News : कर वसुलीसाठी गावकऱ्यांनीच ठेवलेल्या बक्षीस योजनेत सुभाष वाळुंज यांनी पटकावली सोन्याची अंगठी

आंबेगाव तालुक्यातील जवळे ग्रामस्थांनीच करवसुलीसाठी ठेवलेली ५१ बक्षिसे जवळे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित भव्य 'लकी ड्रॉ' सोडत.
Subhash Valunj
Subhash Valunjsakal
Updated on

निरगुडसर - कर भरा आणि सोन्याची अंगठीसह ५१ बक्षिसे जिंका ही गावातीलच काही दानशूर ग्रामस्थांनी ठेवलेल्या बक्षीस योजनेच्या भव्य 'लकी ड्रॉ' सोडतीत सुभाष रंगुजी वाळुंज यांनी प्रथम क्रमांकाची सोन्याची अंगठी पटकावली, ६० वर्षात प्रथमच अशा प्रकारे 'लकी ड्रॉ' सोडतीचे आयोजन जवळे ग्रामस्थानी स्वतःच्या पुढाकाराने केले होते.

आंबेगाव तालुक्यातील जवळे ग्रामस्थांनीच करवसुलीसाठी ठेवलेली ५१ बक्षिसे जवळे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित भव्य 'लकी ड्रॉ' सोडत कार्यक्रम १६ मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाला, यामध्ये ज्या ग्रामस्थांनी, खातेदारांनी आपली घरपट्टी ग्रामपंचायतकडे भरणा केलेली आहे.

या सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकून शेवटच्या बक्षिसाकडून 'लकी ड्रॉ' ची सुरुवात करण्यात आली. यामध्ये एकूण ५१ बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी भाग्यवान विजेते पुढील प्रमाणे द्वितीय क्रमांक नीता संतोष तराळ (एल सी डी टीव्ही), तृतीय क्रमांक बबनराव मारुती बोराटे (कपाट), चतुर्थ क्रमांक देवराम कोंडीबा गावडे (वॉटर फिल्टर), पाचवा क्रमांक बबनराव नामदेव लोखंडे (ड्रेसिंग टेबल), सहावा क्रमांक कांताबाई रामदास मोरडे (बॅटरी पंप) आदी एकूण ५१ विजेते भाग्यवान ठरलेल्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रत्येक खातेदाराला ओला कचरा व सुका कचरा असे दोन डस्टबिन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले.

यावेळी जवळे गावचे सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील, उपसरपंच मनीषा टाव्हरे, चंद्रकला गायकवाड, प्रमिला गावडे, संगीता साबळे सर्व सदस्य तसेच कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला भगिनी उपस्थित होते, यावेळी सूत्रसंचालन शीला साबळे यांनी केले.

सरपंच वृषाली शिंदे पाटील म्हणाल्या की, घरपट्टी भरणा करणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य जनतेने भरभरून साथ दिली यांच्यासह 'लकी ड्रॉ'साठी बक्षीस देणारे सर्व बक्षीसदाते गावकऱ्यांचे असे सर्वांचं ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व राहिलेल्या सर्व ग्रामपंचायत खातेदारांनी ३१ मार्च पूर्वी आपली घरपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com