Municipal Commissioner naval kishor ram
sakal
पुणे - पुणे महापालिकेमध्ये उमेदवारी न मिळालेल्या नाराज राजकीय कार्यकर्त्यांना त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांचे डोळे स्वीकृत नगरसेवक पदाकडे लागलेले आहे. असे असताना आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील पक्षनेत्यांना या पदासाठी नावांची शिफारस करावी असे पत्र दिले आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील इच्छुकांकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे.