Pune News : ‘आनंद घेणे’ माणसाचा मूलभूत अधिकार; अभिनेते सुबोध भावे, ‘आनंदाचे झाड’ पुस्तकाचे प्रकाशन
Subodh Bhave: ‘आनंदाचे झाड’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अभिनेता सुबोध भावे यांनी आनंद हा माणसाचा मूलभूत अधिकार असल्याचे मत मांडले. मोबाईलमुळे लहानग्यांमधील पुस्तकांचा आनंद हरवला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे : ‘‘आनंदी देशांच्या यादीत भारताचा आज १४५ वा क्रमांक लागतो. देशाच्या परंपरेत पाहिले तर आनंदी माणसे आपल्या देशात होती, अन्यथा अजंठा-वेरूळ, खजुराहो घडले नसते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा सर्वंकष आनंद घेण्याची तेव्हा वृत्ती होती.