

16,000-Tablet Batch Recalled from Thergaon Hospital Amid Quality Concerns
Sakal
-संदीप सोनार
काळेवाडी : नवीन थेरगाव महापालिका रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या औषधांचे वाटप होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. रुग्णाच्या नातेवाइकाने ते निदर्शनास आणून दिल्यावर त्या गोळ्या नजरचुकीने देण्यात आल्याची सारवासारव रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली, तसेच संपूर्ण १६ हजार ४०० गोळ्यांची बॅच महापालिकेच्या भांडार विभागाला परत पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले.