
Kothrud Roads
Sakal
कोथरूड : कोथरूड परिसरातील परमहंसनगर चौकात बसथांब्यासमोर डांबरीकरण करण्यात आले होते. त्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने डांबर, खडी रस्त्यावर पसरली आहे. या खडीवरून दुचाकी घसरून दोन तरुणी जखमी झाल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.