पुण्याचे जिल्‍हाधिकारी राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे योग्‍य समाधान झाले पाहिजे. त्‍यांच्‍या तक्रारीची दखल घेऊन निराकरण केले पाहिजे.

पुणे : ''जिल्‍हाधिकारी पदावर काम करताना अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंग आले, पण त्‍यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍यात यशस्‍वी झालो,'' अशा शब्‍दांत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम (Pune District Collector) यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. जिल्‍ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासन राबवावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

जिल्हाधिकारी राम (Naval Kishore Ram) यांची नुकतीच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव (PMO India) म्हणून बदली झाली आहे. तत्‍पूर्वी शुक्रवारी त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्‍हाधिकारी कार्यालयासह विविध शाखांना भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्‍छा दिल्‍या.  

सोन्या-चांदीला आली झळाळी; आजवरच्या उच्चांकी दराची झाली नोंद!​

निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, सुभाष भागडे, सुनील गाढे, भारत वाघमारे, श्रीमंत पाटोळे, आरती भोसले, शिंदे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, खनिकर्म अधिकारी संजय बामणे, राणी ताटे, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, श्रावण ताते, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्‍यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राम म्‍हणाले, जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे योग्‍य समाधान झाले पाहिजे. त्‍यांच्‍या तक्रारीची दखल घेऊन निराकरण केले पाहिजे.

राव यांची बदली झाल्याचे समजताच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ''पुण्याच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या राम यांना पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही चांगली बाब असून ते पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्न करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Succeed in implementing people oriented administration says Pune Collector Naval Kishore Ram