
पुणे - नुकत्याच संपलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्या आणि रुग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढविण्यावर भर दिला. तसेच, मृत्यू दर कमी करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यामध्ये 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत चाचण्यांचे प्रमाण वाढवून दर दिवशी 12 हजार 411 चाचण्या करण्यात आल्या. त्यानुसार दहा दिवसांत 1 लाख 26 हजार116 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच, राज्यातील मृत्युदराचे प्रमाण 3.50 टक्के आहे. पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी मृत्यूदर 2.74 टक्के होता. तो 2.38 टक्क्यावर आला आहे. आयसीएमआरच्या निकषानुसार तो एक टक्के असणे अपेक्षित आहे. हवेली तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरालगतच्या भागात जिल्हा प्रशासनाकडून अधिक लक्ष देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यातील बेड्सची स्थिती :
(13 जुलै आणि कंसात 24 जुलैनंतरची आकडेवारी, वाढ)
ऑक्सिजनविरहीत बेड्स :
16 हजार 57 (24197)
वाढ : 8137
ऑक्सीजन बेड्स :
2 हजार 216 (2326)
वाढ : 110
आयसीयू बेड्स वेंटीलेटरसह :
274 (445)
वाढ : 171
आयसीयू बेड्स
422 (615)
वाढ : 193
आकडेवारीतील तफावत दूर करणार :
आयसीएमआर आणि पुणे प्रशासनातील कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीबाबत तफावत आहे. प्रयोगशाळेतील आणि खासगी रुग्णालये यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि डेटा एंट्री ऑपरेटरकडून माहिती वेळेत अद्ययावत न झाल्यामुळे ही तफावत झाली असून, ती लवकरच दूर करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
बेड्सच्या व्यवस्थापनावर भर :
कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता बेड्सची उपलब्धता प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालय यांच्यातील बेड्स आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. सीओईपी महाविद्यालयासह तीन ठिकाणी सुरु करत येणाऱ्या जम्बो रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 600 ऑक्सिजन आणि 280 आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, 50 पेक्षा कमी बेड्स असलेल्या नर्सिंग होम आणि रुग्णालयांमध्येही कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
(Edited by : Kalyan Bhalerao)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.