
सैन्यदलात भरती होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात परंतु लवकर यश येत नाही. आगम टेकडीवरील जय जवान करिअर अकॅडमीच्या मुलांनी मोठे यश मिळवले आहे. एकूण १९ जणांपैकी १८ जण सैन्यदलात भरती झाले आहेत. त्याबद्दल अॅकॅडमीचे संस्थापक समाधान देशमुख यांनी सैन्यदलात भरती झालेल्या मुलांचा जैन मंदिर येथे सत्कार केला.
आगम टेकडीवर घडले जवान; माजी सैनिक समाधान देशमुख यांचा पुढाकार
कात्रज - सैन्यदलात भरती होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात परंतु लवकर यश येत नाही. आगम टेकडीवरील जय जवान करिअर अकॅडमीच्या मुलांनी मोठे यश मिळवले आहे. एकूण १९ जणांपैकी १८ जण सैन्यदलात भरती झाले आहेत. त्याबद्दल ॲकॅडमीचे संस्थापक समाधान देशमुख यांनी सैन्यदलात भरती झालेल्या मुलांचा जैन मंदिर येथे सत्कार केला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एआरओची भरती प्रक्रिया कोविड-१९ प्रादुर्भावामुळे काही दिवसांपासून प्रलंबित होती. परंतु, लॉकडाऊनमध्ये असंख्य अडचणी आल्या परंतु त्यावर मात करत प्रतिकूल परिस्थितीत ॲकॅडमीच्या मुलांनी यश मिळवले. दरम्यान ॲकॅडमीची आतापर्यंत एकूण ३२ विद्यार्थी सैन्यात भरती झाले आहेत.
महत्त्वाची बातमी: दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाइन होणार? तज्ज्ञांची खलबतं सुरू
योगेश पाटील, धिरज ओंबळे, अभि यादव, अजय गाजरे, तानाजी सुर्यवंशी कपिल सोनवणे, अविनाश कोळेकर, राहुल काशिद, शुभम बिरादार, सचिन मुंडे, आकाश कचरे, स्वप्नील काटकर, रोहित वांजळे, करन रोकडे, वैभव भोईटे, जयराम जाधव, शशी पोटे, श्रषी हे १८ जण सैन्यदलात भरती झाले असून त्यांचा ॲकॅडमीतर्फे सत्कार करण्यात आला.
Edited By - Prashant Patil