
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उशीरा लागला. त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर अडीच महिन्यांनी फेरपरीक्षेबाबत पावले उचलली गेली.
पुणे : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेणे कठीण आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव होता. परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांबाबत (बोर्डाच्या) शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ मंडळींशी बोलणे सुरू आहे. ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. तरी देखील काही मार्ग निघतो का याचा विचार सुरू आहे," अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
- आम्ही कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही तरी.. : छगन भुजबळ
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उशीरा लागला. त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर अडीच महिन्यांनी फेरपरीक्षेबाबत पावले उचलली गेली. त्यात आता कुठे शक्य त्या ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदा दहावी-बारावीची फेरपरीक्षा होणार का? आणि बोर्डाच्या परीक्षा कशाप्रकारे होणार? याबाबत पालक-विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. याबाबत गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन बोर्डाच्या परीक्षेबाबत विचार सुरू असल्याची माहिती देत पालकांना काहीसा दिलासा दिला आहे.
- लग्न किंवा घरगुती कार्यक्रम करताय? जाणून घ्या, पुणे जिल्ह्यातील नवी नियामवली
"राज्यात प्रत्येक भागाच्या अडचणी वेगवेगळे आहेत. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. तरी देखील काही मार्ग निघतो का याचा विचार सुरू असून शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करण्यात येत आहे," असे गायकवाड यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या,"अनेक ठिकाणी आरोग्याची काळजी घेत हळू हळू शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नेटवर्क नसलेल्या ठिकाणी स्वतः शिक्षक जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तालुक्यांमध्ये आदर्श शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. येत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरणार आहे. विविध ऑनलाइन माध्यमांचा वापर करावा लागेल. यासोबतच आदर्श शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे."
- स्वातंत्र्याच्या चौऱ्याहत्तरीनंतरही मिळेना हक्काचा रस्ता; आजारी माणसांना न्यावं लागतंय झोळीतून
विद्यार्थ्यांना शिक्षणपासून वंचित ठेवल्यास शाळांवर होणार कारवाई
"शिक्षण घेणे हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. मात्र याप्रमाणे वर्तन शाळा करत असतील त्यांच्यावर कारवाई होईल," असा इशारा देखील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांबाबत शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ मंडळींशी बोलणे सुरू आहे. राज्यात प्रत्येक भागाच्या अडचणी वेगवेगळे आहेत. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. तरीदेखील यावर विचार सुरू आहे. #MajhaVision2020 #MissionBeginAgain #BackToSchool @abpmajhatv
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 27, 2020
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)