rakhma jadhav with family
sakal
आळेफाटा - बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील रखमा बाळू जाधव यांनी वीस वर्षांपूर्वी एका गायीच्या आधारे सुरू केलेल्या दूध व्यवसायात आज प्रगती करीत यश संपादन केले आहे. रखमा यांनी दहावीची परीक्षा दिल्यानंतर पुढे शेती करण्याचे ठरवले. पंरतु फक्त शेती न करता जोडधंदा म्हणून दुध व्यवसायही सुरू केला. त्यावेळी पंधरा हजार रूपयांची एक जर्सी गाय त्यांनी खरेदी केली.